सध्या जुई 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
अभिनेत्री जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून जुई घराघरात पोहोचली.
सध्या जुई 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सायलीची भूमिका साकारत आहे.
मालिकेत नेहमी साडीत दिसणाऱ्या जुईचा वेस्टर्न लूक समोर आला आहे. जुईने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने लाँग गाऊन परिधान केल्याचं दिसत आहे. हाय हिल्स घालत तिने ग्लॅमरस लूक केला आहे.
जुईने नुकतंच 'होऊ दे धिंगाणा'मध्ये हजेरी लावली होती. यासाठी अभिनेत्रीने हा खास लूक केला होता.
जुईचा हा वेस्टर्न लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरल्याचं चित्र आहे.