Tap to Read ➤

अशी कारणे, ज्यामुळे विवाहबाह्य संबंध अनेक वर्षे टिकतात...

लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स का करतात? कधी विचार केलाय.... तुमचा, जोडीदाराचा....
लग्नातील फसवणूक, नातेसंबंधातील समस्या, नवरा-बायकोचे नाते, मैत्रीण-प्रेयसी नाते, विवाहबाह्य संबंध.... बरेच काही कारणीभूत असते. यामुळे पती किंवा पत्नीचा विचार न करता एखादी व्यक्ती बाहेर प्रेमसंबंध सुरु करते...
फसवणूक

लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड मॅरेज, कोणीही आपला पार्टनर दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू इच्छित नसतो. यामुळे नात्यात प्रेमाऐवजी फसवणूक झाली की सगळेच बदलून जाते.
वागणूक

वैवाहिक बंधनात असतानाही एखादी व्यक्ती दुसऱ्या नात्यात कधी आणि कशी उडी मारायला भाग पाडते याचा कधी विचार केला आहे? जरी अनौपचारिकपणे सुरू झाले तरी थांबणे कठीण होऊन बसते.
भावनिक...

भावनिक झाल्यावर सुरु झालेले प्रेमसंबंध कधीच संपत नाहीत. काही काळानंतर ते एवढे एकत्र येतात की एकमेकांपासून वेगळे होणे कठीण जाते.
रोमँटिक...

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जोडीदाराशिवाय आधीपासूनच दुसरे कोणीतरी असते तेव्हा हे संबंध कधीच संपत नाहीत. मनात कुठेना कुठेतरी त्यांच्यासाठी जागा असते.
वन नाईट स्टँड

जेव्हा एखादा माणूस आपल्या वैवाहिक जीवनापासून पूर्णपणे निराश होतो, तेव्हा जीवनात नवीनपणा आणण्यासाठी तो अशा प्रकारच्या नात्यात येऊ लागतो. मग हे असेच सुरु राहते.
सेक्सचे व्यसन

अशी प्रकरणे वर्षानुवर्षे चालतात कारण त्या व्यक्तीला सेक्सचे व्यसन असते. तो कोणाशीही भावनिक जोडलेला नसतो. जे लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसतात त्यांच्या बाबतीत असे अनेकदा घडते.
सामाजिक सक्ती

समाजाच्या दबावामुळे लोक लग्नाच्या बंधनात बांधले जातात, पण त्यांचे हृदय त्यांच्या आधीच्या प्रियकर, प्रेयसीशी व्यक्तीशी जोडलेले असते. प्रेम आणि सांत्वन मिळवण्यासाठी हे देखील एक कारण आहे.
अपमान , त्रास

जेव्हा तुमचा पार्टनर शारीरिक किंवा मानसिक शोषण करतो, तेव्हा त्यातून मन वळविण्यासाठी लोक बाहेर प्रेम शोधू लागतात.
खरे प्रेम...

शारीरिक जवळीक कालांतराने कमी होते. पण एकमेकांना समजून घेणे हे कायम राहते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना जोडीदाराची साथ मिळत नाही, ते खरे प्रेम बाहेर शोधू लागतात.
निवड चुकली तर...

ज्या लोकांना असे वाटते की आयुष्य़ाचा साथीदार निवडण्यात आपली चूक झाली आहे, ते देखील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये अडकतात. अशा व्यक्तीला लैंगिक आणि भावनिक इच्छेसाठी एखाद्याशी नातेसंबंध जोडण्याची इच्छा असते.
क्लिक करा