Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: आनंददायी दिवस, अर्थप्राप्ती संभवते; सुख-शांतता लाभेल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: मनाची एकाग्रता कमी झाल्याने दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी.
वृषभ: घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल.
मिथुन: आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. येणी वसूल होतील. लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. अचानक धनलाभ संभवतो.
कर्क: आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही.
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील.
कन्या: आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. अचानक धनलाभ.
तूळ: आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल.
वृश्चिक: आज मानसिक हळवेपणा वाढेल. अभ्यास व कारकीर्द कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील.
धनु: आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे.
मकर: आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल.
कुंभ: आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मीन: घरी एखादे मंगल कार्य होईल. कार्ये तडीस जातील. नवीन कामे हाती घेण्यास शुभ दिवस.
क्लिक करा