Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२४: उत्पन्नात वाढ; सरकारी कामात अनुकूलता

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू याने आनंद वाढेल.
वृषभ: परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चाबाबतीतही चिंता राहील. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजापासून जपून राहावे.
मिथुन: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. लाभाच्या बातम्या मिळतील. विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्क: नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ, पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. सरकारी कामात अनुकूलता लाभेल.
सिंह: आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कन्या: मनावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. खर्च खूप होईल.
तूळ: प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी, परिधान करण्याची संधी मिळेल. मान-सन्मान मिळेल.
वृश्चिक: शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी, गुप्त शत्रूंवर मात करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतीत.
धनु: कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील. संताप वाढेल. संततीची काळजी वाटेल. धनप्राप्ती होईल.
मकर: मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही.
कुंभ: चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ व सामाजिक मान-प्रतिष्ठा मिळेल.
मीन: बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च होतील.
क्लिक करा