Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २० ऑक्टोबर २०२४: आर्थिक योजना बनवाल; अनुकूल दिवस

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. भोजन वेळेवर घेता येणार नाही. आजचा दिवस सामान्य आहे.
वृषभ: आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ होऊ शकतो. आत्मविश्वासात वृद्धी होईल.
मिथुन: आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील.
कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे.
सिंह: प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. मतभेद होतील.
कन्या: शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. मतभेद होतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद होईल.
तूळ: हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. अधिक खर्च मनाला अस्वस्थ करतील. अडचणीत याल.
वृश्चिक: नोकरी, व्यापार, व्यवसायात भरपूर लाभ होणार आहे. आनंदी राहाल. संपत्ती वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
धनु: आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . कार्यात सफलता व यश मिळेल.
मकर: कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती विशेष कामगिरी करतील. शेअर-लॉटरी यांसह मित्रांकडून लाभ होईल.
कुंभ: स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. विद्यार्थ्यांना यश लाभेल.
मीन: आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
क्लिक करा