Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर संयमित

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष : नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. दुपार नंतर संयमित राहावे लागेल.
वृषभ : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
मिथुन : वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल.
कर्क : आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल.
सिंह: परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल.
कन्या : आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळावे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील.
तूळ :  शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल.
वृश्चिक : मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल.
धनु : सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो.
मकर : व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते.
कुंभ : आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल.
मीन : गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल.
क्लिक करा