Tap to Read ➤

पदोन्नती होईल, व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील

२४ जुलै २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल.
वृषभ - आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील.
मिथुन- आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही.
कर्क- आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे.
सिंह- आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील.
तूळ- आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल.
वृश्चिक- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही व त्यामुळे मनाला वेदना होतील.
धनु- आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे.
मकर- आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ- आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील.
मीन- आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल.
क्लिक करा