Tap to Read ➤

राशीभविष्य : आज व्यापारात लाभ होईल, विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील...

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल.
आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा - गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. एखादी दुर्घटना संभवते.
आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल.
आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. स्त्री किंवा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.
आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल.
कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल.
आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामे सफल बनतील. आत्मविश्वास वाढेल.
आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. कुटुंबीय किंवा सगे - सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील.
आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती ह्यांच्या कडून लाभ संभवतो.
आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते.
आज आपण जरी शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील.
आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे.
क्लिक करा