Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : शत्रूवर मात कराल, आरोग्य उत्तम राहील

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील.
आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्ट्या दिवस अत्यंत आनंददायी ठरेल.
आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल, महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे.
व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल.
आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल.
आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.
आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक खर्च उदभवतील. पोटाचे विकार संभवतात.
आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल.
क्लिक करा