स्त्री व पाण्यापासून जपून राहावे लागेल; कोणत्या राशीच्या लोकांना सल्ला
Rashi Bhavishya in Marathi Today: आज तुमचा दिवस कसा जाईल? तुमचे राशी भविष्य काय आहे?
वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री व पाण्यापासून जपून राहावे लागेल.
आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल.
आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील.
आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील.
आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील.
आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.
आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल.
कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल.
आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. व त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा.
आजचा दिवस नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल.
आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल.
आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात.