IPL इतिहासातील सर्वात महागड्या टॉप १० खेळाडूंच्या यादीत फक्त २ भारतीय
एक नजर टाकुयात टॉप १० मधील महागड्या खेळाडूंवर
IPL च्या १८ व्या हंगामासाठी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाच्या लिलावात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पाहायला मिळू शकतो.
IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात महागड्या टॉप १० च्या यादीत फक्त २ भारतीयांचा समावेश आहे. इथं एक नजर टाकुयात टॉप १० मधील महागड्या खेळाडूंवर
२०२४ च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने २४.७५ कोटी रुपये मोजल्याचे पाहायला मिळाले होते.
सनरायझर्स हैदराबादनं २०२४ च्या मिनी लिलावात पॅट कमिन्सवर २०.५० कोटी रुपयांची उधळण केली होती.
२०२३ मध्ये च्या हंगामात सॅम कुरेनसाठी पंजाबच्या संघानं १८.५० कोटी रुपये मोजले होते.
२०२३ मध्ये कॅमरुन ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सच्या संघानं - १७.५० कोटी रुपये मोजल्याचे पाहायला मिळाले होते.
बेन स्टोक्स हा देखील IPL मधील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने १६.२५ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात घेतलं होते.
राजस्थान रॉयल्सच्या संघानं २०२१ मध्ये क्रिस मॉरिससाठी १६.२५ कोटी मोजले होते.
सिक्सर किंग युवराज सिंग याच्यासाठी दिल्ली डेअरडेविल्सच्या संघानं २०१५ मध्ये १६ कोटी एवढी मोठी रक्कम मोजली होती.
मेगा लिलावाआधी २१ कोटीमध्ये रिटेन झालेल्या निकोलस पूरनसाठी २०२३ मध्ये LSG नं १६ कोटी मोजले होते.
२०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं पॅट कमिन्ससाठी पर्समध्ये १५.५० कोटी एवढी रक्कम खर्च केली होती.
मुंबई इंडियन्सच्या संघाने २०२२ च्या हंगामात ईशान किशनसाठी १५.२५ कोटी रुपये मोजले होते.