टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारे १० महारथी
या पठ्ठ्यानं भारताकडून ठोकलीये सर्वात जलदग सेंच्युरी
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय वंशाच्या एस्टोनियाच्या साहिल चौहान क्रिकेटरच्या नावे आहे. त्याने साय्रस विरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूत शतक झळकावले होते.
भारतीय क्रिकेटर उर्विल पटेल याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गुजरातकडून खळताना त्रिपुराविरुद्धच्यासामन्यात २८ चेंडूत शतक झळकावले.
कॅरेबियन स्टार बॅटर ख्रिस गेल याने २०१३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून खेळताना पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते.
रिषभ पंतनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील २०१८ च्या हंगामात दिल्लीकडून खेळताना ३२ चेंडूत शतक ठोकले होते.
दक्षिण आफ्रिकेचा बॅटर विहान लुब्बे याने २०१८ मध्ये नॉर्थ वेस्टकडून खेळताना लिंपोपाविरुद्ध ३३ चेंडूत शतक ठोकल्याचा रेकॉर्ड आहे.
नामिबियाच्या जान निकोल लोफ्टी ईटन याने २०२४ मध्ये नेपाळ विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यात ३३ चेंडूत सेंच्युरी केली होती.
झिम्बाब्वेच्या सिकंदर रझानं गाम्बिया विरुद्धच्या सामन्यात ३३ चेंडूत शतक झळकावले होते.
अँड्रू सायमंड्सनं ३४ चेंडूत शतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. केंट संघाकडून खेळताना त्याने टी-२० मध्ये धमाकेदार इनिंग खेळली होती.
ऑस्ट्रेलियन ऑल राउंडर सीन एबॉट याने सरेकडून खेळताना केंट विरुद्ध २४ चेंडूत शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले होते.
कुशल मल्ला या नेपाळच्या गड्याने मंगोलिया विरुद्धच्यासामन्यात ३४ चेंडूत शतक केले होते. चीन विरुद्ध त्याने ही खेळी केली होती.