Tap to Read ➤

दादा कोंडकेंच्या नावावर आहे सिल्व्हर ज्युबिली हिट्सचा गिनीज रेकॉर्ड

एकेकाळी सेन्सॉर बोर्डाचीही उडवली होती झोप...
दादा कोंडके यांना ओळखत नसेल अशी एकही व्यक्ती आताही तुम्हाला सापडणार नाही. सेन्सॉर बोर्डाचीही झोप उडवणारे असे दादा कोंडके होते.
दादा कोंडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट केले. सर्वाधिक सिल्व्हर ज्युबिलीवाले चित्रपट दादा कोंडके यांनीच दिले.
यामुळेच त्यांचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं. ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगाव येथे दादा कोंडकेंचा जन्म झाला.
१९९८ रोजी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं बालपण कसं गेलं आणि आपण कुठे कशा परिस्थितीत राहायचो याबद्दल भाष्य केलं होतं.
दादा कोंडके यांच्यावर एकदा दु:खाचा डोंगर कोसळला होता. एका अपघातात त्यांना आपलं संपूर्ण कुटुंब गमवावं लागलं. यात त्यांचा फक्त मोठा भाऊ वाचला होता.
यानंतर 'मी खूप तुटलो होतो. मला प्रश्न पडतो की देवाने माझ्याशी असं का केले? मी कोणाशीही बोललो नाही. जेवणही केलं नाही असं ते म्हणाले होते.
त्यानी नंतर जवळ असलेल्या एका दुकानात काम करण्यास सुरुवात केली. तिकडे त्यांना ६० रुपये मिळायचे. याशिवाय त्यांनी लग्नाच्या बँडमध्येही काम करण्यास सुरुवात केली.
कालांतरानं त्यांनी केलेली कॉमेडीही सर्वांना आवडायला लागली आणि त्यांच्या नावाच्या चर्चा होऊ लागल्या. आशा भोसलेंमुळे त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
१९६९ तांबडी माती यातून त्यांनी पदार्पण केलं आणि या चित्रपटाला नॅशनल अवॉर्डही मिळाला. १९७१ मध्ये ते प्रोड्युसर बनसे आणि त्यांनी अनेक चित्रपट केले.
त्यांचे ९ चित्रपट इतके हिट ठरले की २५ आठवडे हे चित्रपट सतत सुरू होते. यानंतर त्यांचं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आलं.
१४ मार्च १९९८ रोजी दादा कोंडके यांचं मुंबईत निधन झालं.
क्लिक करा