Tap to Read ➤

कोहलीनं MS धोनीला केलं ओव्हरटेक; खास रेकॉर्डमध्ये टॉप ५ मध्ये कोण कोण?

इथं पाहा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या भारतीय क्रिकटर्ससंदर्भातील खास स्टोरी
न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. पण तरीही या स्टार क्रिकेटरनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराट कोहलीनं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे.
बंगळुरुच्या मैदानात विराट कोहली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५३६ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. यासह धोनीचा विक्रम मागे पडला.
महेंद्रसिंह धोनीनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५३५ सामने खेळले आहेत. यात टी-२०, वनडे आणि कसोटी तिन्ही प्रकारातील सामन्यांचा समावेश आहे.
रताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या आघाडीच्या ५ खेळाडूंसदर्भातील माहिती
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीतही अव्वलस्थानी आहे. १९८९-२०१३ या कालावधीत सचिन तेंडुलकरनं ६६४ आंतरारष्ट्रीय सामने खेळल्याचे पाहायला मिळाले आहे.
या यादीत आता विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. २००८ पासून आतापर्यंत त्याच्या खात्यात ५३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची नोंद आहे.
महेंद्रसिंह धोनी याने २००४ ते २०१९ या कालावधीत ५३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
५०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल द्रविडचाही समावेश आहे. १९९६ ते २०१२ या कालावधीत द्रविडनं ५०४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारतीय संघाच्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहली आधी २००७ मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या रोहित शर्मानं आतापर्यंत ४८६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
क्लिक करा