Tap to Read ➤

उष्माघात म्हणजे काय? काय काय केल्यास त्रास होतो... हे टाळा

पथ्यपाणी नको, काही खायचे प्यायचीही गरज लागणार नाही.... दारु पिणाऱ्यांना सर्वाधिक धोका
उष्माघात म्हणजेच उन लागणे, याला इंग्रजी भाषेत 'सनस्ट्रोक' म्हणतात.
जेव्हा तुमचे शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा असे होते.
जेव्हा उष्माघात होतो तेव्हा शरीराचे तापमान वेगाने वाढते आणि ते कमी करता येत नाही.
जेव्हा एखाद्याला उष्माघाताचा झटका येतो तेव्हा शरीरातील घाम येण्याची यंत्रणाही बिघडते आणि त्या व्यक्तीला अजिबात घाम येत नाही.
उष्माघाताच्या 10 ते 15 मिनिटांत शरीराचे तापमान 106°F किंवा त्याहून अधिक वाढू शकते.
यावर वेळीच उपचार न केल्यास मृत्यू किंवा अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते.
उष्माघात होण्याची कारणे?
खूप उष्ण ठिकाणी दीर्घकाळ राहिल्याने सनस्ट्रोक किंवा उष्माघात होऊ शकतो.
थंड वातावरणातून कोणी अचानक गरम हवेच्या ठिकाणी गेल्यास उष्माघाताचा धोकाही वाढतो.
उष्ण हवामानात जास्त व्यायाम करणे हे देखील उष्माघाताचे प्रमुख कारण आहे.
उन्हाळ्यात जास्त घाम आल्यावर पुरेसे पाणी न पिल्याने उष्माघात होऊ शकतो.
उन्हाळ्यात घाम आणि हवेशीर कपडे न घातल्यास उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
जास्त मद्यपान करणाऱ्यांमध्ये शरीराचे तापमान सुधारण्याची शक्ती कमी होते. त्याना धोका असतो.
क्लिक करा