Tap to Read ➤

बँकेत का मागितला जातो 'Cancelled Cheque', कुठे होतो त्याचा वापर?

तुम्हीही अनेकदा विमा कंपनी, अथवा बँकेत Cancelled Cheque दिला असेल
डिजिटल आणि नेट बँकिंगच्या काळातही आजही अनेक विमा कंपन्या, बँका ग्राहकांकडून कॅन्सल चेकची मागणी करतात.
जेव्हा तुम्ही बँकेत किंवा अन्य ठिकाणी कॅन्सल चेक देता. तर त्यावर सही करण्याची गरज नसते. केवळ Cancelled लिहावं लागते
त्याशिवाय चेकवर क्रॉसची खूण देखील करू शकता. कंपन्या आणि बँका कॅन्सल चेक ग्राहकांचे अकाऊंट पडताळणीसाठी घेतात.
सामान्यपणे, कॅन्सल चेक दिल्यावर त्यावर तुमच्या अकाऊंट नंबरचा उल्लेख असतो. त्या बँकेत तुमचे खाते आहे हे कळते.
कॅन्सल चेकद्वारे कुणीही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्याचा वापर फक्त अकाऊंट पडताळणी करण्यासाठी होतो
जेव्हा कुणाला कॅन्सल चेक दिला जातो, त्यावर Cancelled लिहावे लागते. जेणेकरून त्याचा चुकीचा वापर होऊ नये.
तुम्ही ज्यावेळी आर्थिक व्यवहार करता जसं उदाहारणार्थ जर तुम्ही कर्ज घ्यायला जाल तर तिथेही कॅन्सल चेक मागितला जातो.
कॅन्सल चेकवर नेहमी काळा अथवा निळ्या शाईच्या पेनाचा वापर करावा. PF चे पैसे काढण्यासाठीही कॅन्सल चेक द्यावा लागतो.
कॅन्सल चेकवर तुमच्या अकाऊंटचे सगळे डिटेल्स असतात. त्यामुळे चेक कुणालाही देऊ नये.
क्लिक करा