Tap to Read ➤

कोण आहे श्रेयंका पाटील? जिनं WPL मध्ये अष्टपैलू खेळीनं कमावलं नाव

श्रेयंकानं बॉलिंग अन् बॅटिंग दोन्हीमध्येही केली कमाल, चाहते सुखावले
महिला प्रीमियर लीगमध्ये RCB चं कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली. त्यांनी सलग ४ सामने गमावले आहेत.
या खराब कामगिरीत टीममधील ऑलराऊंडर खेळाडू श्रेयंका पाटील हिच नाव माध्यमांमध्ये चर्चेत आले आहे.
श्रेयंकाने बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलीय. आतापर्यंत ३ सामन्यात तिने ४९ रन्स आणि २ विकेट्स घेतल्या आहेत.
महिला टीम इंडियात श्रेयंकाला भवितव्य आहे. कारण तिच्यात बॅटिंगसह ऑफ स्पिन खेळीने बाजी पलटवण्याची क्षमता आहे.
श्रेयंकाने वयाच्या ८ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ती कर्नाटकच्या बंगळुरू इथं राहणारी आहे.
२० वर्षीय श्रेयंका काही महिन्यापूर्वी सीनियर वूमेन ODI टूर्नामेंटमध्ये तिच्या कामगिरीमुळे चर्चेत आली होती.
श्रेयंकाच्या याच कामगिरीमुळे WPL 2023 च्या लिलावात तिला RCB कडून त्यांच्या टीममध्ये घेण्यास भाग पाडलं.
श्रेयंका पाटील ही विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे. २००८ च्या सीझनपासून ती RCB टीमला सपोर्ट करते.
एकदा श्रेयंकाला तिच्या वडिलांच्या मित्राच्या मदतीने विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळाली होती.

Your browser doesn't support HTML5 video.

कर्नाटकातील या तरूणीने अवघ्या कमी वयात केलेल्या कामगिरीने दिग्गज खेळाडूंचेही लक्ष वेधून घेतले आहे.
क्लिक करा