Tap to Read ➤

यशस्वीच्या निशाण्यावर असेल मॅक्युलमचा 'तो 'वर्ल्ड रेकॉर्ड

दहा वर्षांपासून अबाधित आहे हा वर्ल्ड रेकॉर्ड
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम मोडीत निघणार आहेत. युवा सलामीवर यशस्वी जैस्वालच्या नजराही खास वर्ल्ड रेकॉर्डवर असतील.
न्यूझीलंडच्या ब्रेन्डन मॅक्युलम या सिक्सरचा खास वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या अगदी टप्प्यात असल्याचे दिसून येते.
जुलै २०२३ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या   युवा सलामीवीर यशस्वीनं  आतापर्यंतच्या ९ कसोटी सामन्यात ६८.५३ च्या सरासरीसह ७०.०७ च्या स्ट्राइक रेटनं त्याने १०२८ धावा केल्या आहेत. जैस्वालच्या खात्यात ३ शतके आणि ४ अर्धशतकांची नोंद आहे.
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल याला मॅक्युलमच्या नावे असणारा एका वर्षात कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्व विक्रम मागे टाकण्याची संधी असेल.
मॅक्युलम याने २०१४ मध्ये एका वर्षात कसोटीत ३३ षटकारांसह वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. हा रेकॉर्ड गेल्या १० वर्षांपासून अबाधित आहे.
२०२४ मध्ये यशस्वी जैस्वाल याच्या भात्यातून आतापर्यंत २६ षटकार निघाले आहेत. बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत त्याने ८ षटकार मारले तर १० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक होईल.
कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेन स्टोक्सचाही समावेश आहे. २०२२ मध्ये त्याने यशस्वी इतकेच म्हणजे २६ षटकार मारले होते. एका षटकारासह यशस्वी आधी त्याला मागे टाकेल. मग मॅक्युलमच्या विक्रमाला सुरुंग लावण्याची त्याच्याकडे संधी असेल.
क्लिक करा