Tap to Read ➤

हिवाळ्यात करून खायलाच पाहिजेत ही ५ प्रकारची लोणची

हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. म्हणूनच हिवाळ्यात ही काही लोणची आवर्जून करून खायला पाहिजेत. कारण ती अतिशय आरोग्यदायी मानली जातात.
उन्हाळ्यात जसं घरोघरी आंब्याचं लोणचं घातलं जातं, तसंच हिवाळ्यातही काही लोणची आपण करायलाच पाहिजेत.
यापैकी सगळ्यात पहिलं आहे आवळ्याचं लोणचं. आवळा अतिशय गुणकारी असतो. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तो पोटात जाणं गरजेचं असतं.
मुळा खूप लोकांना आवडत नाही. पण त्याचं लोणचं करून एकदा खाऊन पाहा. हमखास प्रत्येकवर्षी करून पाहाल.
गाजराचं लोणचंही या दिवसांत अनेकजणी हौसेने घालतात.
मिरचीचं लोणचंही हिवाळ्यात अनेक जण करतात. हिरव्या मिरच्यांमध्ये लिंबाचा रस घालायचा आणि थोडा लोणचं मसाला टाकायचा. हे लोणचं अतिशय चवदार लागतं.
लिंबू- मिरची हा देखील हिवाळी लोणच्यातला एक प्रसिद्ध प्रकार. यात लिंबू आणि मिरची सम प्रमाणात घेऊन लोणचं घातलं जातं.
क्लिक करा