Tap to Read ➤
Zomato चे दीपिंदर गोयल बनले अब्जाधीश, पाहा किती आहे एकूण संपत्ती?
झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीये.
दीपिंदर गोयल आता अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. झोमॅटोच्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी आल्यानं गोयल यांची संपत्ती एक अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली.
झोमॅटोच्या शेअरमध्ये जुलै २०२३ च्या नीचांकी पातळीवरून आतापर्यंत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
दरम्यान, शेअरमधील तेजीमुळे गोयल आता ८,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक बनलेत.
सध्या गोयल यांच्याकडे झोमॅटोमध्ये ३६.९५ कोटी शेअर्स म्हणजेच ४.२४ टक्के हिस्सा आहे.
मध्यमवर्गातून आलेल्या दीपिंदर सिंग गोयल यांनी आयआयटी दिल्लीतून मॅथ आणि कम्प्युटिंग विषयात पदवी घेतली आहे.
२०११ मध्ये इन्फो एजकडून सुरुवातीचं फंडिंग मिळाल्यानंतर गोयल आणि त्यांच्या टीमनं झोमॅटोच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली.
कंपनीनं भारताच्या फूड टेक्नॉलॉजी क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय आणि २०१८ मध्ये ही कंपनी युनिकॉर्न बनली.
क्लिक करा