पुसदमध्ये १६ वर्षात १२२ शेतकरी आत्महत्या

By Admin | Published: March 29, 2017 12:29 AM2017-03-29T00:29:39+5:302017-03-29T00:29:39+5:30

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात गत १६ वर्षात तब्बल १२२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

122 farmers suicides in 16 years in Pusad | पुसदमध्ये १६ वर्षात १२२ शेतकरी आत्महत्या

पुसदमध्ये १६ वर्षात १२२ शेतकरी आत्महत्या

googlenewsNext

पुसद : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात गत १६ वर्षात तब्बल १२२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यापैकी शासनदरबारी ५८ आत्महत्या पात्र तर तब्बल ६४ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. तर वर्षभरात १२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची माहिती आहे.
सततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर यामध्ये फसलेला कास्तकार, जीवन कसे जगायचे? या विवंचनेतून ‘एक्झीट’ होतानाचे विदारक चित्र तालुकाभर पाहायला मिळत आहे. मागील वर्षभरात १ जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत तब्बल १२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. २०१६ मध्ये २४ जानेवारीला चिंचघाट येथील रामकृष्ण पवार, १२ एप्रिलला नांदुरा (ईजारा) येथील विजय चव्हाण, १७ एप्रिल रोजी फुलवाडीच्या किसन राठोड १८ मे रोजी कारला (देव) येथील विलास राठोड, २९ जून रोजी बोरी (म.) येथील महिला शेतकरी भागूबाई गव्हाणे यांनी जीवनयात्रा संपविली. ५ जुलै रोजी पारवा (खुर्द) येथील भावराव राठोड, ७ सप्टेंबर रोजी गहुलीचे खुशाल राठोड, २३ सप्टेंबरला वेणी (खुर्द) येथील प्रदीप कटारे व ५ आॅक्टोबर रोजी पारवा (खुर्द) येथील सदाशिव चव्हाण आदी शेतकऱ्यांनी इहलोकीचा निरोप घेतला.
शिवणी येथील महिला कास्तकार कमलाबाई जामकर यांनी १६ आॅक्टोबर रोजी विष प्राशन करून मृत्युला कवटाळले तर ३ नोव्हेंबरला शिवानगरच्या दिलीप जाधव यांनी गळफास लावून घेतला. कान्हा येथील गणपत ढंगारे यांनी १० डिसेंबर आत्महत्या केली. गत वर्षभरातील १२ पैकी चार शेतकरी आत्महत्या पात्र तर आठ आत्महत्या शासनाने अपात्र ठरविल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 122 farmers suicides in 16 years in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.