सीईओंचा दणका : कळंब पंचायत समितीतील लेटलतिफांवर कारवाईकळंब : येथील पंचायत समितीतील लेटलतिफ १८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना स्वत: पंचायत समिती उघडावी लागल्याच्या प्रकारानंतर झालेल्या या कारवाईने कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. डॉ.कलशेट्टी यांनी मंगळवारी या कार्यालयाला अनपेक्षित भेट दिली होती.वेतनवाढ रोखलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विस्तार अधिकारी (पंचायत) अशोक ठाकरे, विस्तार अधिकारी (उद्योग) भूपेंद्र बाहेकर, विस्तार अधिकारी (कृषी) पंकज बरडे, विस्तार अधिकारी (कृषी) ज्योती नेहारे, वरिष्ठ सहायक विद्या सुरतकर, जयमाला भलावी, पशुधन पर्यवेक्षक प्रज्ञा काळे, आरोग्य सेवक डी.एन. मेहत्रे, कनिष्ठ सहायक गजेंद्र बोरीकर, राजेंद्र बळी, पंकज वाईकर, वरिष्ठ सहायक (लेखा) ए.आर. नंदनवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एम.व्ही. माटे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चंद्रकांत जवळकर, परिचर बी.पी. कांबळे, मोहम्मद जावेद शेख, अनिता वाईचोळे, प्रतिभा सायरे यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
१८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली
By admin | Published: July 17, 2014 12:20 AM