लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.मुसळधार पावसामुळे बेंबळा धरणाचे बुधवारी रात्री १० वाजतापासून १० दरवाजे उघडण्यात आले. इतर १० दरवाचे सुद्धा २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. बेंबळात १ जून पर्यंत केवळ १० टक्केच पाणी होते. सध्या ४० टक्केच जलसाठा आहे. तरीही २० दरवाजे उघडण्यात आल्याने हे धरण पूर्णपणे भरूच द्यायचे नाही, असे दिसून येत आहे. धरणाचे पाणी सोडल्यामुळे बेंबळानदी काठावरील सावंगी (मांग) गावाला पुराचा वेढा पडला आहे. बाभूळगावातील एका पुलावरुन पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर हा मार्ग बंद होता.शहरालगतच्या नदीला गुरुवारी पूर आल्यामुळे काठावरील चार कुटुंबाना उर्दू शाळेत हलविण्यात आले. या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था नगरपंचायतीने केली. यावेळी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रकांत परचाके, कांग्रेसचे गटनेते श्रीकांत कापसे, शेख कादर, नईम खान, अनिकेत पोहेकर, रियाज शेख, शेख आरम, मुख्याधिकारी अश्विनी पाटील उपस्थित होत्या. गुरुवारी पाऊस असल्याने आठवडी बाजाराला येणाऱ्या ग्राहकांची त्रेधातिरपट उडाली होती. पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचून राहिले आहे. रस्त्यावरून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बेंबळाचे २० गेट उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 9:57 PM
संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.
ठळक मुद्देबाभूळगावात पूर : चार कुटुंबांना हलविले