अपर अधीक्षक थेट पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 09:49 PM2019-07-20T21:49:33+5:302019-07-20T21:50:00+5:30
जिल्ह्याला अनेक वर्षानंतर आयपीएस दर्जाचे अपर पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. नुरूल हसन यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली. शनिवारी दुपारनंतर शहरातील चारही प्रमुख पोलीस ठाण्यांना भेट देऊन तेथील ठाणेदार व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याला अनेक वर्षानंतर आयपीएस दर्जाचे अपर पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. नुरूल हसन यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली.
शनिवारी दुपारनंतर शहरातील चारही प्रमुख पोलीस ठाण्यांना भेट देऊन तेथील ठाणेदार व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तत्पूर्वी हसन यांनी सकाळच्या सत्रात स्थानिक गुन्हे शाखा व कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी ओळख करून घेतली. इकतेच नव्हे तर त्यांनी वडगाव जंगल येथील अपघाताच्या घटनास्थळालाही शुक्रवारी रात्री भेट दिली. कर्मचाऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी स्थानिक मुद्यावर सखोल चर्चा त्यांनी केली.
गुन्हेगारी टोळ्या व सदस्यांची ‘कुंडली’ मागितली
अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलीस ठाण्यांना भेट दिली असता तेथे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांची ‘कुंडली’ मागितली. याशिवाय सक्रिय गुन्हेगारांच्या हालचालींबाबत पूर्व इतिहास व आताच्या घडामोडीतील सहभाग याचाही सखोल आढावा घेतला. ठाण्यांमध्ये कुठल्या स्वरूपाचे गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांबाबतही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलीस ठाण्यांचे भौगोलिक क्षेत्र, उपलब्ध व मंजूर अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या याचाही आढावा त्यांनी घेतला.