लोकमत न्यूज नेटवर्कपुसद :टक्कल तसंच घेऊनमी कॉलेजात गेलोमले वाटलं जसंमी लंडनला आलोटक्कल माहा पाहूनसाऱ्या कॉलेजच्या पोरी हसल्यामले वाटलं एका दमातसाऱ्याच कशा फसल्या !अशा वऱ्हाडी कवितांनी पुसदकरांना पोट धरून हसविले. निमित्त होते. होळीच्या रंगारंग रंगोत्सव कार्यक्रमाचे. पतंजली योग परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा भारत पुसद तालुका प्रभारी प्रवीण मस्के यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा.डॉ. प्रल्हाद वावरे यांच्या वऱ्हाडी कविता रंगल्या, तर सेवानिवृत्त शिक्षक ल.पु. कांबळे यांची मिमिक्री आणि नकलांनी बहार आली.सेवानिवृत्त प्रा. अशोक बोबडे यांनी विनोदी चारोळ्या सादर केल्या, तर मध्येच काही गंभीर आठवणीही पुढे आल्या.जुन्या पुस्तकांची वही मिळालीपरवा पुस्तके वाचतानाकिती डोळ्यात आसवे आलीतजुन्या त्या श्रावणात नाहतानानिसर्गरम्य वातावरणात रंगलेला रंगोत्सव कार्यक्रम संस्मरणीय ठरला. यावेळी पतंजली योग समितीच्यावतीने पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अखिलेश अग्रवाल, सचिव अनिल चेंडकाळे, प्रा. दिनकर गुल्हाने, प्रा.डॉ. प्रल्हाद वावरे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी वनभोजनाचा आनंद लुटला. प्रास्ताविक शरद बजाज, तर सूत्रसंचालन मनोज नाईक यांनी केले.या कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे प्रकाश वानरे, विलास पलिकोंडावार, विजय पद्मावार, प्रवीण मस्के, पंडित गादेवार, डॉ. राजेंद्र बिडवई, संतोष वानखडे, दिगांबर जगताप, अॅड. विलास देशमुख, अशोक महाजन, सुभाष राय, डॉ. पंकज जयस्वाल, बालाजी कामिनवार, श्रीरंग सरनाईक, अमोल चांडक, पंजाब कदम, संतोष कनोजे, शंकर मंदाडे, उपलेंचवार यांच्यासह योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टक्कल पाहून साऱ्या पोरी हसल्या, मले वाटलं साऱ्याच कशा फसल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 9:22 PM
वऱ्हाडी कवितांनी पुसदकरांना पोट धरून हसविले. निमित्त होते. होळीच्या रंगारंग रंगोत्सव कार्यक्रमाचे. पतंजली योग परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा भारत पुसद तालुका प्रभारी प्रवीण मस्के यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला.
ठळक मुद्देपुसदमध्ये रंगारंग रंगोत्सव : निसर्गरम्य वातावरणात कविता, नकला, मिमिक्री