लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची धरपकड केली. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून ताब्यात घेतलेल्या अनेकांना मंगळवारी दुपारपर्यंत अक्षरश: डांबून ठेवले. या आंदोलकांना शहर ठाण्यात एलसीबीतील एका सहायक पोलीस निरीक्षकाने वाद घालून मारहाण केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. आंदोलकांनी त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवून निलंबित करण्याची मागणी लावून धरली.पोलिसांच्या विविध पथकांनी सोमवारी रात्रीपासून काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. महाजनादेश यात्रेच्या मार्गातील गावांमधूनही काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यवतमाळ प्रहार जनशक्ती पक्षाच्या व काँग्रेस कार्यकर्त्यांना सोमवारी सकाळी ७ वाजतापासून मंगळवारपर्यंत पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले. अनेकांना जेवणही मिळाले नाही. पोलिसांना सहकार्याच्या भूमिकेत असलेल्या आंदोलकांना मंगळवारी सकाळी शहर ठाण्यात येऊन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाºयाने थेट मारहाण सुरू केली. प्रहारचे जिल्हा प्रमुख नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांच्यासह पाच ते सहा जणांना खोलीत डांबून मारले. इतकेच नव्हे तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार पाहून शांततेने बसलेले कार्यकर्ते बिथरले. शहरातील इतर समर्थकही पोलीस ठाण्यात पोहोचले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही दडपशाही विरोधात जाब विचारण्यासाठी शहर ठाण्यात धडक दिली. शहर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आंदोलकांना काही संबंध नसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाºयाने सुडबुद्धीने मारहाण का केली असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.आंदोलकांचा रोष पाहून ठाणेदार धनंजय सायरे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी संबंधित सहायक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हे नोंदविण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाली. तेव्हा आंदोलकांचा रोष कमी झाला. नितीन मिर्झापुरे यांच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात एपीआय लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच लांडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, त्यांना स्थानिक गुन्हे शाखेतून काढण्यात यावे ही मागणीसुद्धा करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या संदर्भात ठोस भूमिका घेतली जाईल, असेही नितीन मिर्झापुरे, काँग्रेस शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांच्याकडून सांगण्यात आले.जिल्हाभर कार्यकर्त्यांची धरपकडपोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्रच धरपकड केली. आर्णीतही प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लाडखेड ठाण्याच्या हद्दीतील तिवसा, चाणी येथील सहा कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. यवतमाळातही दारव्हा नाका, लोहारा चौकातून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दारव्हा येथे मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला बसस्थानकाजवळ काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. सभेतही नारेबाजी करणाºया काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार व शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी कारवाई केली. सभेपूर्वीच सकाळी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना एपीआयकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 10:00 PM
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची धरपकड केली. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून ताब्यात घेतलेल्या अनेकांना मंगळवारी दुपारपर्यंत अक्षरश: डांबून ठेवले. या आंदोलकांना शहर ठाण्यात एलसीबीतील एका सहायक पोलीस निरीक्षकाने वाद घालून मारहाण केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली.
ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेचा विरोध दडपण्याचा प्रयत्न : शहर ठाण्यात आंदोलन, निलंबनाच्या कारवाईची मागणी