पाण्याचे सर्वात चांगले नियोजन महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:08 PM2019-02-20T15:08:49+5:302019-02-20T15:09:51+5:30

पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे.

Best water planning in Maharashtra | पाण्याचे सर्वात चांगले नियोजन महाराष्ट्रात

पाण्याचे सर्वात चांगले नियोजन महाराष्ट्रात

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारची मोहर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जलपुरस्कारासाठी महाराष्टष्ट्राची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सन्मानित केले जाणार आहे.
देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशात जल क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे देश पातळीवर मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्याची परंपरा केंद्र सरकारने २००७-०८ पासून सुरू केली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जल पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची निवड झाली आहे. जलसंपदा व पाण्याचे न्यायोचित, समसमान वितरण आणि व्यवस्थापनासाठी या प्राधिकरणाची स्थाापना झाली आहे. जागतिक बँकेची मदत व केंद्र सरकारच्या सहभागाने उभारले जाणारे प्रकल्प, सिंचन सुविधेतून निर्माण झालेल्या जलसंपदेचे शेती सिंचन, उद्योग, कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प, स्थानिक स्वराज्य क्षेत्रात समसमान पेयजल वितरण व्यवस्था, नद्या व पाणी स्रोतांचे संपूर्ण व्यवस्थापन यासाठी हे प्राधिकरण कार्यरत आहे.
या क्षेत्रात प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व अंमलबजावणीचे होत असलेले सकारात्मक परिणाम याचा सर्वंकश विचार करून केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट जलनियमन प्राधिकरण म्हणून प्रथम पुरस्कारासाठी निवड केली आहे. पंतप्रधानासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, अभियांत्रिकी सदस्य विनय कुळकर्णी, विधी सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी, अर्थ सदस्य डॉ.एस.टी. सांगळे, सचिव रसिकलाल चव्हाण हे हा सर्वोत्कृष्ट सन्मान स्वीकारणार आहे.

महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरी
सर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अधिकाराला जीवन जगण्याचा मूलभूत-मौलिक अधिकार म्हणून संवैधानिक मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील प्राधिकरणाने महत्वपूर्ण आदेश पारित केले आहे. सर्वोत्कृष्ट जल पुरस्काराच्या निकषात महाराष्ट्रातील जलसंपत्ती प्राधिकरण सर्वच निकषावर सर्वोत्कृष्ट ठरल्याने देशातील सर्वोत्कृष्ट प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे, अशी माहिती विधि सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी दिली.

Web Title: Best water planning in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी