लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यावरून बुधवारी चक्क अध्यक्ष आणि बांधकाम सभापतींमध्येच ‘तू-तू-मै-मै’ झाली.येत्या ५ जानेवारीला स्थायी समितीची रद्द झालेली सभा होत आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी आढावा बैठक झाली. बैठकीला अध्यक्ष माधुरी अनिल आडे, उपाध्यक्ष यांच्यासह बांधकाम सभापती निमीष मानकर आदी उपस्थित होते. त्यात मानकर यांनी १० जानेवारीला होणाऱ्या तहकूब सर्वसाधारण सभेनंतर लगेच विशेष सभा घेऊन त्यात कोलाम पोड जोड रस्त्यांचा विषय ठेवण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी तहकूब सभेचेच भरपूर विषय असून लगेच विशेष सभा घेणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. त्याच दिवशी विशेष सभा घेतल्यास सदस्यांना उशिरापर्यंत थांबावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. अध्यक्षांच्या भूमिकेनंतर बैठकीतील वातावरण आणखी तापले. अध्यक्षांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात नंतर काही दिवसांनी ही सभा घेण्याचे त्यांनी सूचित केले.या दोघांमधील हा वाद सभागृहाबाहेर येताच जिल्हा परिषदेत विविध चर्चांना उधाण आले. नुकतेच नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत ५ जानोरीला स्थायीची, तर १० जानेवारीची सर्वसाधारण सभा होणार आहे. तत्पूर्वीच पदाधिकाºयांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने प्रशासन पुन्हा शिरजोर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कोलाम पोडातील जोड रस्त्यांची १० कोटींची कामेकोलाम पोडांना जोडणाऱ्या रस्त्यांची सुमारे १० कोटींची कामे आहे. यापूर्वी विविध कारणांनी निधी परत गेला. हा निधी मार्चपर्यंत खर्ची घालावयाचा आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी त्वरित विशेष सभा घेण्याचा आग्रह बांधकाम सभापतींनी धरला. निधी परत गेल्यास पदाधिकाºयांवर खापर फुटेल, अशी भीती त्यांना वर्तविली. मात्र पाणीटंचाईसह विविध विषयांवर तहकूब सभेत चर्चा होणार असल्याने गडबडीत विशेष सभा का घ्यायची, असा मुद्दा अध्यक्षांनी रेटला. निधी परत जाऊ नये, यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतींमध्ये बिनसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:51 PM
जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यावरून बुधवारी चक्क अध्यक्ष आणि बांधकाम सभापतींमध्येच ‘तू-तू-मै-मै’ झाली. येत्या ५ जानेवारीला स्थायी समितीची रद्द झालेली सभा होत आहे.
ठळक मुद्देतू-तू-मै-मै : स्थायी समितीच्या पूर्वतयारी बैठक गाजली, विशेष सभा बोलविण्यावरून वाद