पत्नीच्या तक्रारीवरून तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 09:22 PM2019-08-26T21:22:36+5:302019-08-26T21:22:58+5:30
पत्नीला बेकायदेशीरपणे तीन तलाक देणाऱ्या पतीविरोधात अखेर महागाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
महागाव (यवतमाळ):- पत्नीला बेकायदेशीरपणे तीन तलाक देणाऱ्या पतीविरोधात अखेर महागाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झालेल्या गुन्ह्याची ही तिसरी घटना असून, यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. हिवरा येथील आरोपी शेख मोबीन शेख जब्बार याने १५ ऑगस्ट रोजी पत्नी नसरीन परवीन हीस मारहाण करून तीन तलाकद्वारे घटस्फोट दिला होता.
पRडित पत्नी नसरीन परविन हिने पतीविरोधात महागाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु हा गुन्हा महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून ठाणेदार दामोदर राठोड यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. परंतु अखेर याप्रकरणी महागाव पोलिसांना पीडित महिलेची तक्रार ग्राह्य मानून सोमवारी 26 ऑगस्ट रोजी आरोपी पती विरोधात भादंवि २९४, ५०६, आणि मुस्लिम महिला विवाह हक्काचा संरक्षण कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल केला.