लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रसिध्द साहित्यिक नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिलेले निमंत्रण वापस घेण्यात आले. या प्रकाराच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हा काँगे्रस कमिटीने मूक आंदोलन केले. येथील महात्मा फुले चौकात आंदोलक चेहऱ्याला काळया पट्ट्या बांधून सहभागी झाले होते.९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना निमंत्रण दिले होते. सरकारच्या दबावानंतर हे निमंत्रण मागे घेण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात विचारांची मुस्कटदाबी करण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी केले. यामध्ये माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, महिला काँगे्रस जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, बाबासाहेब गाडे पाटील, अरुण राऊत, नितीन जाधव, अतुल राऊत, अनिल गायकवाड, जाफर खान, जितेंद्र मोघे, साहेबराव खडसे, अरविंद वाढोणकर, रामराव पवार, उमेश इंगळे, प्रदीप डंभारे, इस्तेहाकभाई, सिकंदर शाह, आनंद शर्मा, रोहित देशमुख, संध्याताई इंगोले, अरुणा खंडाळकर, जया पोटे, पल्लवी रामटेके, जितेश नवाडे, ललित जैन, लकी जयस्वाल, घनश्याम अत्रे, रामराव पवार, बालू काळे आदी सहभागी झाले होते.
साहित्यिकांच्या मुस्कटदाबीविरूद्ध काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:25 AM