लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात एका कंत्राटदाराने चक्क अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका नगरसेवकाच्या जागृतकतेने मोठा अनर्थ टळला.नामदेव माणिकराव वागतकर (२९) रा.रुई-गोस्ता, ता. मानोरा जि.वाशिम असे त्या कंत्राटदाराचे नाव आहे. येथील पंचायत समितीमार्फत चौदाव्या वित्त आयोगातून विहिरीचे खोदकाम करण्यात आले. मात्र त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे नामदेव वागतकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. या युवा कंत्राटदाराने चौधाव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी तालुक्यातील रामपूरनगर-सावरगाव गोरे येथे एका विहिरीचे खोदकाम केले. मात्र सहा महिने लोटूनही कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पंचायत समितीच्या चकरा मारून त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने अखेर सोमवारी चक्क बीडीओंच्या कक्षातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.नगरसेवक शाकिब शाहा यांच्या प्रसंगवधानाने कंत्राटदाराचे प्राण वाचले. विशेष म्हणजे वागतकर यांनी बिलासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तथापि कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची वेळ ओढवली. दरम्यान, यावेळी गटविकास अधिकारी समाधान वाघ आपल्या कक्षात उपस्थित नव्हते. त्यांची येथून बदली झाली आहे. मात्र अद्याप येथून ते कार्यमुक्त झाले नाही.
पुसद पंचायत समितीत कंत्राटदाराने पेटवून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 9:43 PM
येथील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात एका कंत्राटदाराने चक्क अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका नगरसेवकाच्या जागृतकतेने मोठा अनर्थ टळला.
ठळक मुद्देआत्मदहनाचा प्रयत्न : कामाचा मोबदला मिळाला नसल्याचा आरोप