यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची गती वाढली; २४ तासात १५२ पॉझेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:07 PM2020-09-08T21:07:55+5:302020-09-08T21:08:44+5:30
गत २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात नव्याने १५२ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून पाच कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत २४ तासात जिल्ह्यात नव्याने १५२ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून पाच कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 42 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या पाच जणांमध्ये यवतमाळ शहरातील 53 वर्षीय व 60 वर्षीय अशा दोन महिला, आर्णी शहरातील 67 वर्षीय पुरूष, पांढरकवडा तालुक्यातील 42 वर्षीय महिला व 24 वर्षीय पुरुष आहे. तसेच गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 152 जणांमध्ये 88 पुरुष व 64 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 32 पुरुष व 18 महिला, वणी शहरातील सहा पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष व तीन महिला, उमरखेड तालुक्यातील एक पुरूष व एक महिला, पुसद शहरातील दोन पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, नेर शहरातील पाच पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील एक पुरूष व चार महिला, घाटंजी शहरातील दोन महिला व तालुक्यातील दोन महिला, दिग्रस शहरातील 20 पुरुष व 15 महिला, दारव्हा शहरातील दोन पुरूष, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील चार पुरूष व तीन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील दोन पुरूष व पाच महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 960 ?क्टीव्ह पॉझेटिव्ह असून होम आयसोलेशनमध्ये 277 जण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4544 झाली आहे. यापैकी 3182 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 124 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 234 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 201 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 57322 नमुने पाठविले असून यापैकी 53933 प्राप्त तर 3389 अप्राप्त आहेत. तसेच 49389 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.