पावित्र्य राखून निर्माल्य रथाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:45 AM2021-09-18T04:45:20+5:302021-09-18T04:45:20+5:30
शेंबाळपिंपरी : येथील ग्रामपंचायतीने श्रींच्या उत्सवानिमित्त पावित्र्य राखून पूजेचे साहित्य विसर्जनासाठी निर्माल्य रथाची निर्मिती केली आहे. जल प्रदूषण दूर ...
शेंबाळपिंपरी : येथील ग्रामपंचायतीने श्रींच्या उत्सवानिमित्त पावित्र्य राखून पूजेचे साहित्य विसर्जनासाठी निर्माल्य रथाची निर्मिती केली आहे.
जल प्रदूषण दूर सारून निर्माल्य रथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतीने केले. निर्माल्य कलश एका ऑटोमध्ये ठेवण्यात आला. पूजेसाठी गणेशाला वाहिलेली फुले, हार, दुर्वा, रुई व इतर वनस्पतींची विल्हेवाट लावण्यासाठी निर्माल्य रथाची निर्मिती करण्यात आली. एक दिवसाआड गावामध्ये फेरी काढून लोकांना आवाहन केले जात आहे. निर्माल्य रथात टाका, आम्ही त्याची योग्य विल्हेवाट लावू, असा संदेश दिला जात आहे.
‘श्रीं’चा उत्सव घरोघरी साजरा होतो. अनेक वनस्पतींचा उपयोग श्रींच्या चरणी होतो. ग्रामपंचायतीने निर्माल्य रथ तयार केला. त्यात घरोघरी असणारे हे साहित्य जमा करून वड्याजवळील जमिनीत खड्डा करून त्यात टाकले जाते. यापासून भविष्यात कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग केला जाणार आहे. यापुढे ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ ही संकल्पना ठेवून एका घंटागाडीद्वारे घराघरांतील केर कचरा गोळा केला जाणार आहे. त्यापासूनही कंपोस्ट खत तयार करण्याचा मानस असल्याचे सरपंच रवींद्र महल्ले यांनी सांगितले.