अंबरदिवा नसल्यानेच पेटविले राळेगाव ‘एसडीओं’चे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:55 PM2017-11-29T23:55:14+5:302017-11-29T23:56:18+5:30
वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाºयांनी शासनाला पाठविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाºयाचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे.
मंत्री, सनदी अधिकारी व राज्य सेवेतील दंडाधिकाºयांच्या वाहनांवरील दिवे काढले गेले आहे. त्यामुळे सर्वत्र ओरड पहायला मिळते. सध्या केवळ पोलिसांच्या वाहनावर अंबरदिवे आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असल्याचे कारण सांगून पोलिसांना अंबरदिवे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंत्री, जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दिवा नाही, मात्र ठाणेदारांच्या वाहनावर अंबरदिवा असे विसंगत चित्र सर्वत्र पहायला मिळते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तालुका, उपविभागीय आणि वेळप्रसंगी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाही संतप्त जमावापुढे जावे लागते. त्यामुळे दंडाधिकाºयांनाही अंबरदिवा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी ‘सीएमओ’ व सचिवालयात सनदी अधिकाºयांकडून केली गेली आहे. अंबरदिवा नसल्याने काय घटना घडू शकतात याचा हवालाही देण्यात आला आहे. त्यात राळेगाव तालुक्याच्या सखी (कृष्णापूर) गावात १६ सप्टेंबर २०१७ रोजी घडलेल्या घटनेचाही समावेश आहे.
या घटनेबाबत यवतमाळच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला गोपनीय अहवाल सादर केला आहे. त्यात राळेगावचे एसडीओ संदीपकुमार अपार यांच्या शासकीय वाहनावर अंबरदिवा नसल्यानेच त्यांचे वाहन पेटविले गेल्याचे अहवालात म्हटले आहे. कृष्णापूर भागात वाघाचे हल्ले वाढले होते. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग वाघाला पकडण्यासाठी कोणत्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत नसल्याने गावकºयांचा वन खात्याच्या अधिकाºयांवर रोष होता. घटनेच्यावेळी गावात आलेले वाहन वन विभागाचेच आहे, असे समजून गावकऱ्यांनी हे वाहन पेटवून दिले. या वाहनावर अंबरदिवा असता तर हे वाहन एसडीओ-तहसीलदारांचे आहे, अशी ओळख पटली असती. पर्यायाने जमाव ंआक्रमक झाला नसता व वाहन पेटविण्याची ही घटना टळली असती, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.
दिव्याअभावी कृष्णापूर घटनेच्या पुनरावृत्तीची भीती
वाहनावर अंबरदिवा नसल्याने कृष्णापूरच्या घटनेची कुठेही पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी दंडाधिकारीय अधिकारी संतप्त जमावाच्या गर्दीत जाणे टाळतात, बहुतांश विलंबाने जाण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. जमाव अनेकदा पोलिसांची वाहने पेटवितो, मात्र दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना सहसा हात लावत नाही, असा अनुभव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना अंबरदिवा लावण्याची परवानगी देऊन त्यांची ओळख पुन्हा बहाल करावी, असा महसूल अधिकाºयांमधील सूर आहे.