लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अनेक वर्ष तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले आणि आता नगरपंचायत झालेले ढाणकी शहर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. मोठ्या संघर्षानंतर चार दलघमी पाणी ढाणकीसाठी आरक्षित करून त्यातील दोन दलघमी पाणी त्वरित पैनगंगा नदी पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र प्रशासनाने हा आदेश डावलला असून अजूनही पाणी सोडलेले नाही.ढाणकी गावाची लोकसंख्या ३० हजारांच्यावर आहे. या गावाला पैनगंगा नदीच्या गांजेगाव येथील पात्रातून पाणी पुरवठा केला जातो. ग्रामपंचायत असताना दरवर्षीच हिवाळ्यापासूनच ढाणकी गावाला पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. त्यातच नगरपंचायतीची घोषणा झाल्यावर किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा वाटली होती. नगरपंचायत झाल्यावर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी निवेदने देऊन पाण्यासाठी आंदोलनाचे इशारेही दिले होते. मात्र पुढे फार काही झाले नाही.आज रोजी ढाणकी गावात पाचशे लिटर पाणी दीडशे ते दोनशे रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. पाणी टंचाई एवढी तीव्र असून प्रशासनाने अद्यापही गावाभोवताच्या विहिरींचे अधिग्रहण करण्याची तसदी घेतलेली नाही. यावरूनच पाणी प्रश्नावर प्रशासन चालढलक करीत असल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकाºयांनी ९ मे रोजी लेखी स्वरूपात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्या आदेशात पाटबंधारे विभाग उमरखेड तहसीलदार व इतर सर्व जबाबदार विभागांना प्रतिलिपी देण्यात आली. तरीही नदी पात्रात अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही.गेल्या दीड महिन्यांपासून नळाला पाणी नाही. प्रशासनाने आता तरी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा मान राखून आणि ढाणकीवासीयांच्या जीवाची काळजी घेऊन पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही ढाणकी तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:02 PM
अनेक वर्ष तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले आणि आता नगरपंचायत झालेले ढाणकी शहर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. मोठ्या संघर्षानंतर चार दलघमी पाणी ढाणकीसाठी आरक्षित करून त्यातील दोन दलघमी पाणी त्वरित पैनगंगा नदी पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
ठळक मुद्देप्रशासन निर्ढावले : आरक्षित पाणी नदीपात्रात सोडलेच नाही, विहिरींच्या अधिग्रहणाकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष