बदलीसाठी बनावट कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:03 PM2019-05-13T22:03:02+5:302019-05-13T22:08:24+5:30

एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Fake documents for transfer | बदलीसाठी बनावट कागदपत्रे

बदलीसाठी बनावट कागदपत्रे

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामसेवकाचा प्रताप : चौकशी समितीच्या अहवालाकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्णी तालुक्यात सध्या कार्यरत नागरगोजे नामक ग्रामसेवक पूर्वी रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला. त्यात आपली पत्नी यवतमाळ जिल्ह्यातील एका संस्थेवर स्वयंपाकी म्हणून कार्यरत असल्याचे कागदपत्र जोडले. पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमानुसार ते पात्र ठरल्याने शासनाने त्यांच्या आंतरजिल्हा बदलीला मंजुरी दिली. त्यानंतर ते यवतमाळ जिल्हा परिषदेत रुजू झाले. वास्तविक कर्मचाऱ्याला रुजू करून घेताना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी त्या विभाग प्रमुखाची असते. मात्र येथील जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे ग्राह्य धरून त्यांना रुजू करून घेतले.
आता या प्रकरणाचा भंडफोड झाला. त्या ग्रामसेवकाने पत्नी एका संस्थेत स्वयंपाकी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र त्या संस्थेत दुसरीच व्यक्ती स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सदर ग्रामसेवकाने पत्नी संस्थेत नोकरीत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून बदली करवून घेतल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यात संस्थेचीही परस्पर फसवणूक झाली. त्यामुळे ती संस्थाही ग्रामसेवकाविरूद्ध फौजदारी तक्रार करणार असल्याचे कळते.
तीन दिवसात अहवाल
जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यीय चौकशी समितीचे प्रमुख विस्तार अधिकारी रामदास चंदनकर आहे. या समितीत नेरच्या विस्तार अधिकारी रिंकी डाबरे आणि यवतमाळचे विस्तार अधिकारी आर.आर. जारंडे यांचा समावेश आहे. ही समिती येत्या दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार असल्याचे चंदनकर यांनी सांगितले. सदर ग्रामसेवक संघटनेचा तालुका पदाधिकारीसुद्धा आहे. तथापि त्याला रुजू करून घेतानाच या सर्व कागदपत्रांची पडताळणी का करण्यात आली नाही, याची चौकशी होणेही गरजेचे झाले आहे.

Web Title: Fake documents for transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.