शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा
By admin | Published: January 22, 2015 02:14 AM2015-01-22T02:14:34+5:302015-01-22T02:14:34+5:30
शेतकऱ्यांनी स्वत:च्या व गावाच्या विकासाकरिता एकोपा ठेवण्याबरोबरच परस्परांना सहकार्य करण्याचे धोरण अवलंबून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, ....
यवतमाळ : शेतकऱ्यांनी स्वत:च्या व गावाच्या विकासाकरिता एकोपा ठेवण्याबरोबरच परस्परांना सहकार्य करण्याचे धोरण अवलंबून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांनी केले.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्यावतीने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रकल्पाअंतर्गत चौकी (आकपुरीे) शेतकऱ्यांसाठी आयोजित कृषी व कायदेविषयक प्रबोधन शिबीरात त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एम.एम. आगरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तहसीलदार अनुप खांडे, गटविकास अधिकारी ईश्वरकर, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.आर.के.मनक्षे, अॅड.राजेश चव्हाण, डॉ.पालार्वार, प्राचार्य अविनाश शिर्के, भा.उ.वाघमारे तसेच लोकप्रतिनिधी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी विविध शासकीय योजना व त्यासाठी शासन देत असलेल्या अनुदानाची माहिती दिली. यावेळी वरिष्ठ कृषी संशोधक डॉ.पालार्वार, मधुकरराव खडसे, अॅड.आर.के. मनक्षे यांनी मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)