आमदारांच्या दत्तक गावात पांदण रस्त्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:58 PM2017-11-29T23:58:02+5:302017-11-29T23:58:14+5:30

तालुक्यातील चातारी ते साखरा या साडेतीन किलोमीटरच्या अर्धवट पांदण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चातारी येथील शेतकºयांनी चक्क रस्त्यावरच मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे.

Fasting for Pandan road in the adoptive village of MLA | आमदारांच्या दत्तक गावात पांदण रस्त्यासाठी उपोषण

आमदारांच्या दत्तक गावात पांदण रस्त्यासाठी उपोषण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील चातारी ते साखरा या साडेतीन किलोमीटरच्या अर्धवट पांदण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चातारी येथील शेतकºयांनी चक्क रस्त्यावरच मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे. आमदार राजेंद्र नजरधने यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यामतून २००२ साली या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने एका कंत्राटदाराला दिले होते. परंतु कामाला टक्केवारीचे ग्रहण लागल्याने कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले. त्यानंतर गावकºयांनी लोकवर्गणीतून यारस्त्याची डागडूजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या या रस्त्यावरून चालने कठीेण झाले आहे. शेतकरी त्रस्त झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अद्यापही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी पांदण रस्त्यावरच उपोषण सुरु केले. त्यात अनिल माने, शरद माने, सुशील माने, सुनील नरवाडे, कल्याण वानखडे, भागोराव ठाकरे, चंपत माने, शामराव माने आदी सहभागी आहे. आमदार राजेंद्र नजरधने यांनी दत्तक घेतलेल्या गावातील नागरिकांवर उपोषणाची वेळ आल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

Web Title: Fasting for Pandan road in the adoptive village of MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.