लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : शासनाकडून प्रत्येकाला पक्के घर मिळावे यासाठी घरकूल योजना राबविली जाते. ग्रामपंचायत स्तरावरून निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करून यादी प्रसिद्ध केली जाते. वाई रूई येथील एका कुटुंबाची घरकूलासाठी निवड झाली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही यादी प्रसिद्ध झाली. आता आपल्याला पक्के घर मिळणार या आशेवर हे कुटुंब दिवस काढत होते. मात्र चार वर्षांपासून त्यांची प्रतीक्षा संपलीच नाही. अखेर रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने त्यांचे झोपडीवजा घर जमीनदोस्त झाले. आता त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.सुरेश आनंदराव पंडागळे यांनी यवतमाळ पंचायत समितीत घरकुलासाठी अर्ज केला. प्रक्रियेतून त्यांचे नाव घरकुलाच्या यादीत घेण्यात आले. वारंवार चकरा मारून त्यांनी घरकुलाचा निधी मिळावा व घराचे बांधकाम सुरू करायचे आहे यासाठी आर्जव केली. तब्बल चार वर्षांपासून पंडागळे यांचे प्रयत्न सुरू आहे.
घरकुल लाभार्थ्याचा संसार उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:00 AM
वाई रूई येथील एका कुटुंबाची घरकूलासाठी निवड झाली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही यादी प्रसिद्ध झाली. आता आपल्याला पक्के घर मिळणार या आशेवर हे कुटुंब दिवस काढत होते. मात्र चार वर्षांपासून त्यांची प्रतीक्षा संपलीच नाही. अखेर रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने त्यांचे झोपडीवजा घर जमीनदोस्त झाले. आता त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
ठळक मुद्देचार वर्षांपासून प्रतीक्षेत : रविवारच्या पावसात कोसळली झोपडी