अभयारण्याच्या ‘त्या’ अधिसूचनेची होळी

By admin | Published: January 23, 2015 12:10 AM2015-01-23T00:10:50+5:302015-01-23T00:10:50+5:30

तालुक्यातील इसापूर धरणक्षेत्रातील परिसरात पक्षी अभयारण्याऐवजी आता वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

Holi of the 'those' notification of the sanctuary | अभयारण्याच्या ‘त्या’ अधिसूचनेची होळी

अभयारण्याच्या ‘त्या’ अधिसूचनेची होळी

Next

पुसद : तालुक्यातील इसापूर धरणक्षेत्रातील परिसरात पक्षी अभयारण्याऐवजी आता वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अधिसूचना काढल्याने २१ गावांतील नागरिकांनी जवळा येथे वन्यजीव अभयारण्याच्या जाचक अटींची होळी केली.
जवळा येथे माळपठारावरील २१ गावांच्या नागरिकांनी एकत्र येऊन इसापूर येथे वन्यजीव अभयारण्य होऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या. वन्यजीव अभयारण्यामुळे २१ गावांतील जनजीवन प्रभावित होणार असून अभयारण्य निर्मितीच्या तब्बल १५० जाचक अटींमुळे २५ ते ३० हजार रहिवाशांचे जीवन जगणे कठीण होणार आहे. माळपठार संघर्ष समितीचे जवळा येथील सुधाकर कांबळे म्हणाले, अभयारण्यामुळे येथील अडीच किलोमीटर परिसरात रहिवाशांना चूल पेटविता येणार नाही. तसेच कुऱ्हाडबंदी, जनावरांना चराईबंदी, पीक फवारणी बंदी, विहीर व विंधन विहिरी खोण्यावर बंदी आदी अटी आहेत. त्यामुळे नागरिकांना जगणे कठीण होईल असे ते म्हणाले. आधिच धरणामुळे या २१ गावांचे १९८२ मध्ये पुनर्वसन झाले. त्यामुळे या गावांचा विकास खुंटलेला आहे. ३१ वर्षात विकास झाला नसताना अभयारण्याचे नवे संकट गावकऱ्यांवर कोसळले आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार पक्षी अभयारण्याला गावकऱ्यांचा विरोध नसल्याचे रामदास कांबळे (जवळा) यांनी सांगितले. मात्र वन्यजीव अभयारण्याला २१ गावांतील नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचा निर्णय यावेळी गावकऱ्यांच्या झालेल्या सभेत एकमुखाने घेण्यात आला. येत्या २६ जानेवारी रोजी प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत वन्यजीव अभयारण्याच्या उभारणीचा निर्णय रद्द करण्यात यावा, असा ठराव घेण्यात येणार असल्याचे सुधाकर कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यावेळी मधुकर कलिंदर,, विलास खंदारे, ज्ञानेश्वर मस्के, मोहन आडे, गुलाब गडदे, गोविंदराव ढुमणे, जयानंद भालेराव, नंदू काकडे, बाळू होडगीर, तुकाराम खोकले, गजानन कुकडे, मारोती घाटे, जयवंता मस्के, प्रफुल्ल धुळे, पिंटू इंगोले, उत्तम मस्के, संतोष पांडे, बळीराम माहुरे, दिगांबर दवणे, रामदास कांबळे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Holi of the 'those' notification of the sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.