लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअरब : येथून जवळ असलेल्या हादगाव येथे क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची हत्त्या केली. मंगळवारी सकाळी ७ वाजता पती-पत्नीचा वाद झाला. त्यानंतर पत्नी शेतातील कामासाठी निघून गेली. पतीने शेतात गाठून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर घरात बसून राहिला.सोनू युवराज कचरे (३०) असे मृत पत्नीचे नाव आहे. सोनू ही घरच्या शेतात काम करायची तर युवराज सौरऊर्जा ठेकेदाराकडे मजुरीला आहे. मागील काही दिवसांपासून दोघात सातत्याने खटके उडत होते. मंगळवारी सकाळी पती-पत्नीत वाद झाला. सोनू त्यानंतर शेतात कामाला गेली. थोड्या वेळाने युवराज तिच्या मागावर गेला. गावातीलच प्रशांत गिरी याच्या शेतात ७.३० वाजता युवराजने पुन्हा वाद करत सोनूच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातले. यात ती जागेवरच गतप्राण झाली. घटनेची माहिती प्रशांत गिरी यांनी गावच्या पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी लाडखेड पोलिसांना पतीचा खून केल्याचे सांगितले. घटनेनंतरही तब्बल तीन तास उशिराने लाडखेड पोलीस हादगाव येथे पोहोचले. लाडखेड ठाण्यापासून १५ किलोमीटर अंतरावर घडलेल्या घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांना तीन तास लागले. पत्नीचा खून केल्यानंतर युवराज शांतपणे स्वत:च्या घरात माखलेल्या कुऱ्हाडीसह बसून होता. पोलिसांनी आरोपी युवराजला १० वाजता घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी गणेश नामदेव लकडे रा. पिंपळगाव ता. नांदगाव खंडेश्वर यांच्या तक्रारीवरून सोनू कचरे हिचे सासरे भीमराव कचरे, भूमिकाबाई कचरे (सासू), प्रमोद भीमराव कचरे (भासरा) व पती युवराज भीमराव कचरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चारही आरोपींना तत्काळ अटक केली.मुलगा-मुलगी बेवारसकचरे दाम्पत्याला दहा वर्षाचा मुलगा व सात वर्षाची मुलगी आहे. पतीने पत्नीचा खून केल्यानंतर ही मुले आई-वडिलांना मुकली आहे. त्यांचे मातृ व पितृछत्र हरविले आहे. रागाच्या भरात पतीने केलेल्या कृत्याची शिक्षा या चिमुकल्यांना भोगावी लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
हादगावात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 9:47 PM
येथून जवळ असलेल्या हादगाव येथे क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची हत्त्या केली. मंगळवारी सकाळी ७ वाजता पती-पत्नीचा वाद झाला. त्यानंतर पत्नी शेतातील कामासाठी निघून गेली. पतीने शेतात गाठून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर घरात बसून राहिला.
ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील घटना : पतीसह चौघांना अटक