पती- पत्नीची आत्महत्या; दसऱ्या सारख्या सणाच्या दिवशी गावात शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 03:15 PM2019-10-08T15:15:17+5:302019-10-08T15:17:48+5:30
महागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील रहेमान फाट्याजवळ सार्वजनिक विहिरीत फकीरा गणपत पिटलेवाड (वय 22 वर्षे) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी विहिरीवर पाणी भरण्यात गेलेल्या नागरिकांना निदर्शनास आला.
यवतमाळ: महागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील रहेमान फाट्याजवळ सार्वजनिक विहिरीत फकीरा गणपत पिटलेवाड (वय 22 वर्षे) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी विहिरीवर पाणी भरण्यात गेलेल्या नागरिकांना निदर्शनास आला. नागरिकांना संबंधित प्रकार लक्षात येताच मृतकाचे पत्नी निलाबाई फकीरा पिटलेवाडला कळताच तिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
गेल्या चार दिवसा अगोदर पत्नी व आई हे मृतकाच्या सासरवाडीला काही कामानिमित्त गेले होते. ते काल सायंकाळी गावात आले. मात्र त्यांना फकीरा घरी दिसला नाही. त्यामुळे आईने तो जिथे मोलमजूरीची कामे करतो तिथे चौकशी केली असता, तो आज दिवसभर आलाच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोघी सासु सुन फकीराची वाट पाहून पाहून झोपी गेल्या. सकाळी गावात सार्वजनिक विहिरीत एक पुरुष जातीचे मृतदेह तरंगत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. काही लोकांना संशय आल्यामुळे हि गोष्ट मृतक फकीरा च्या आईला सांगण्यात आली. आईने विहिरीवर जाऊन बघितल्यानंतर हंबरडा फोडला.
विहिरीतील मृतदेह फकिराचा असल्याचे निश्चित झाल्यानंतर या घटनेची माहिती त्याची पत्नी निलाबाई फकीरा पिटलेवाड (वय 25 वर्षे ) हिला मिळाली. तिला पती आता या जगात नाही ही वार्ता कळताच विरहाच्या कल्पनेनेच तिने राहत्या घरात दोराच्या सहाय्याने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली. दसरा सणाच्या दिवशी पती-पत्नी दोघांचाही हा करून अंत पाहतात गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला, कुटुंबा त्यात एकट्याच राहिल्या आहेत.पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून महागावचे ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी संगेपल्लू व बीट जमादार विलास राठोड पुढील तपास करीत आहे.