‘आयएपी’चा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:10 PM2018-02-21T22:10:11+5:302018-02-21T22:10:31+5:30
बालरोग तज्ज्ञांची संघटना असलेल्या इंडियन अकॅडमी आॅफ पीडिअॅट्रीकचे (आयएपी) जिल्हा पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बालरोग तज्ज्ञांची संघटना असलेल्या इंडियन अकॅडमी आॅफ पीडिअॅट्रीकचे (आयएपी) जिल्हा पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. डॉ. पी.डी. अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. येथील इन्फिनिटी स्पोर्टस् क्लबमध्ये झालेल्या पदग्रहण सोहळ्यात मावळते अध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांच्याकडून डॉ. अग्रवाल यांनी कार्यभार स्वीकारला. डॉ. सचिन पाटील यांनी सचिवपदाची सूत्र मावळते सचिव डॉ. रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वीकारली.
या सोहळ्याला नागपूर येथील डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. गिरीश सुब्रमण्यम, यवतमाळ आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळातील अहवाल वाचन केला, तर डॉ. अग्रवाल यांनी विविध वैज्ञानिक चर्चासत्र व कार्यशाळा घेण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. संजीव जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैज्ञानिक चर्चासत्र घेण्यात आले. यात बालकांमध्ये तापाची विविध कारणे या विषयावर डॉ. सुब्रमण्यम यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जयंत उपाध्ये यांनी प्रतीजैविकांचा योग्य वापर याविषयी माहिती दिली. लायन्स क्लबकडून खेतानी, रोटरी क्लबतर्फे छेडा, दिलीप हिंडोचा, अग्रवाल सोशल क्लबतर्फे शरद भूत यांनी डॉ. पी.डी. अग्रवाल यांचा सत्कार केला.
संचालन डॉ. स्वाती शेंडे पाटील, डॉ. संजना लाल यांनी केले. आभार सचिव डॉ. सचिन पाटील यांनी मानले. यावेळी डॉ. संजय भांगडे, डॉ. चिलकर, डॉ. देशपांडे, डॉ. नैताम, डॉ. अश्विन पवार, डॉ. जीवानी, डॉ. राशतवार, डॉ. कुळकर्णी, डॉ. वीरेंद्र राठोड, डॉ. ढवळे आदी उपस्थित होते.