लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची पुणे येथील अॅमॅझॉन या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये ऐश्वर्या गोटेकर व यश कुंभारे यांचा समावेश आहे.कंपनीतर्फे अमरावती येथे पूल कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आला. यात अमरावती विभागातील ११ अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सर्वप्रथम पर्सनल इंट्रोडक्शन राऊंड, ग्रुप डिसक्शन राऊंड, आॅनलाईन रिटर्न व्हरसॅन्ट टेस्ट, व्हाईस व्हरसॅन्ट टेस्ट, आॅपरेशन्स मॅनेजर राऊंडच्या फेºया घेण्यात आल्या. यातून ऐश्वर्या व यश यांची निवड करण्यात आली. त्यांना कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे.कंपनीतर्फे त्यांना १.७९ ते २.७ लाख प्रतिवर्ष पॅकेजसह विविध सोयीसुविधा दिल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या या निवडीचे कौतुक करण्यात आले.
‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची अॅमॅझॉन कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 9:45 PM
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची पुणे येथील अॅमॅझॉन या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची पुणे येथील अॅमॅझॉन या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.