अरुणावतीच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:55 PM2018-11-25T23:55:10+5:302018-11-25T23:56:02+5:30

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे. शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता.

Lack of millions of liters of water in Arunavav | अरुणावतीच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

अरुणावतीच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

Next
ठळक मुद्देशेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : कालवे फुटले, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

हरिओम बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे.
शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता. मात्र सध्या या प्रकल्पाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. प्रकल्पाचे कालवे जागोजागी फुटले आहे. त्यातून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आपल्या डोळ्यादेखत पाणी वाया जात असल्याने बघून शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहे. मात्र त्यांची व्यथा ऐकण्यासाठी कुणीही पुढे येण्यास तयार नाही.
पाणी वाया जात असल्याने सिंचन कमी होत आहे. यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. संबंधित अधिकारी कालवे दुरुस्तीसाठी पुरेसा निधी देण्यास शासन तयार नसल्याचे सांगून मोकळे होत आहे. संपूर्ण कालव्यांची दुरुस्ती करण्याची गरज असताना शासन अपुरा निधी देत आहे. त्यामुळे कालवे दुरुस्ती परिपूर्ण होत नाही. परिणामी लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
एकीकडे शासन पाणी अडवा-पाणी जिरवाचा घोषा लावून पाणी साठविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे लाखो लीटर पाणी साचून वाया जात असताना उपाययोजना केल्या जात नाही. पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. निधी खेचून आणण्यास ते असमर्थ ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहे. पीके वाळत असल्याने ते त्रस्त आहे.
पाणी अडवा-जिरवा
शासनातर्फे राज्यात ठिकठिकाणी पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे, नाला सरळीकरण आदी कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी लोकसहभाग घेतला जात आहे. याच धर्तीवर आता अरुणावतीचे पाणी बचत करण्याची गरज आहे. वाहून जाणारे पाणी अडवून त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी आता शासनासह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून चंचित राहणार आहे.

Web Title: Lack of millions of liters of water in Arunavav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.