लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची पोटनिवडणूक होत आहे. मंगळवार हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडी, भाजपच्या उमेदवारासह १५ जणांनी नामांकन दाखल केले. यावेळी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.विधान परिषदेत महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार उतरविला जाणार याची उत्सुकता होती. स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळात महाविकास आघाडी सरस ठरणारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडूनच महाविकास आघाडीचा उमेदवार देण्यात आला. नागपूर येथील दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांनी नामांकन दाखल केले.यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक नेते संजय राठोड, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार बाळू धानोरकर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, मनोहरराव नाईक, माणिकराव ठाकरे, अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, कीर्ती गांधी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, समीर देशमुख आदी उपस्थित होते. नामांकन दाखल केल्यानंतर सर्वच नेते मंडळींनी विजय निश्चित असल्याचे सांगून मिठाईचे वाटपही केले.भाजपकडून विधान परिषदेचा उमेदवार कोण याचा काऊंटडाऊन शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. अखेर सुमित बाजोरिया यांनी भाजपकडून नामांकन अर्ज दाखल केला. सोबतच जगदीश वाधवाणी यांनीसुद्धा नामांकन दाखल केले. यावेळी आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार अॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार नामदेव ससाने, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील मतदार बाहेरचा उमेदवार यावेळी निवडणार नाही, असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला.या प्रमुख उमेदवारांसह उमरखेड काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, यवतमाळातील काँग्रेसचे नगरसेवक जावेद अन्सारी, दिग्रस येथील अपक्ष नगरसेवक शेख जावेद, महाराष्टÑ विकास आघाडीकडून संजय देरकर, प्रशांत पवार, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, महागाव येथून आरिफ सुरैय्या, दीपक निलावार, राजू दुधे, शंकर बडे, नूर महंमद खान, सतीश भोयर आदींनी नामांकन अर्ज दाखल केले.शुक्रवारी होणार लढतीचे चित्र स्पष्टनामांकन अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार १७ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. पक्षाच्या चिन्हावर मतदान होत नाही. पसंतीक्रमाने मतदान करावे लागते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सबळ असलेला आणि स्थानिक मतदारांमध्ये प्रभावी ठरणाऱ्या उमेदवाराचे पारडे जड राहणार आहे. नामांकन मागे घेतल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.अनुमोदकासाठीच घोडेबाजारनामांकन दाखल करताना दहा मतदारांचे अनुमोदन आवश्यक आहे. त्यांच्या स्वाक्षºया मिळविण्यासाठीच घोडेबाजार झाला. आर्थिक दिग्गज रिंगणात आल्याने पहिल्या दिवसापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांचे भाव वधारले आहे. स्वाक्षरी करण्यासाठीही अनेकांनी टोकण घेतल्याची चर्चा रंगत आहे.भाजपची उमेदवार मिळविण्यातच दमछाकभाजपला विधान परिषदेसाठी उमेदवार मिळवितानाच दमछाक झाली. महाविकास आघाडीने नकारलेला उमेदवार भाजपने रिंगणात उतरविला आहे. भाजपच्या दडपशाहीच्या धोरणाला सर्वच जण ओळखून आहेत. त्यामुळे विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीतील पक्षातून बंडखोरी झाल्यास त्यांच्याविरुद्ध पक्षनेतृत्व कारवाई करेल अशी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महाविकास आघाडी, भाजपसह १५ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 6:00 AM
विधान परिषदेत महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार उतरविला जाणार याची उत्सुकता होती. स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळात महाविकास आघाडी सरस ठरणारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडूनच महाविकास आघाडीचा उमेदवार देण्यात आला. नागपूर येथील दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांनी नामांकन दाखल केले.
ठळक मुद्देविधान परिषद निवडणूक : अखेरच्या दिवशी उमेदवारांंचे शक्तिप्रदर्शन