शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका

By admin | Published: December 29, 2016 12:31 AM

कुणाचाही आधार नसलेल्या गीताबाई भिकाजी इंगोले हिचा दीर्घ आजारामुळे उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

नागरिकच बनले नातेवाईक : निराधार गीताबार्इंनी घेतला अखेरचा श्वास अविनाश खंदारे  उमरखेड कुणाचाही आधार नसलेल्या गीताबाई भिकाजी इंगोले हिचा दीर्घ आजारामुळे उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कारासाठी उमरखेड शहरातील महिला व पुरुष एकत्र आले. कुणीही नातेवाईक नसलेल्या गीताबार्इंना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले. यातून उमरखेड शहरातील माणुसकी अद्याप जिवंत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होत्या. उमरखेड शहरातील रहिवासी गीताबाई भिकाजी इंगोले (९५) हिला तीन मुले व एक मुलगी होती. त्यात पतीचे लवकरच निधन झाल्यामुळे गीताबाई निराधार झाल्या. त्यातच दोन मुले व एक मुलगी यांचाही अकाली आजारात मृत्यू झाला. त्यामुळे गीताबाईला जवळचे म्हणावे असे कुणीही या जगात नव्हते. एक मुलगा उरला तोही २४ तास दारूच्या नशेत. त्यामुळे तिला दररोज भिक्षा मागून उदरनिर्वाह केल्याशिवाय पर्याय नाही. अनेक वर्षे शहरात पायी फिरून भिक्षा मागून कसेतरी दिवस काढले. पण गेल्या दोन वर्षांपासून तिला चालता येत नव्हते. पायही टाकता येणे शक्य नव्हते. दिवसेंदिवस प्रकृती अधिकच ढासळत चालली होती. अशातच सोमवारी सकाळी गीताबाईची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे तिला उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचार केला गेला. परंतु प्रकृतीने साथ दिली नाही आणि रात्री ८ वाजता दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. जवळचे कुणीही नातेवाईक नाही. तिचा मुलगा तोही दारूच्या नशेत. त्यामुळे रात्रभर शासकीय रुग्णालयातच तिचा मृतदेह राहिला. ही बातमी नागरिकांच्या कानावर पडताच त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात धाव घेतली आणि लोकवर्गणी करून अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. कुणी रोख पैसे दिले तर कुणी साडी आणली. तिच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू नागरिकांनी गोळा केल्या. ही बातमी अष्टविनायक गणेश मंडळाच्या मुलांना समजल्यावर त्यांनी पैशाची व्यवस्था करून गीताबाईला नेण्यासाठी स्वर्गरथाची व्यवस्था केली. पाहता पाहता शासकीय रुग्णालयातील गर्दी वाढत गेली. शंभर टक्के निराधार असलेल्या गीताबाईला शेवटपर्यंत राहायला घर नव्हते. पुसद रोडवर असलेल्या प्रताप चव्हाण यांच्या वर्कशॉपमध्ये तिला आसरा दिला होता. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत ‘ज्याचे नाही कोणी, त्याचे आहो आम्ही’, असे म्हणत शहरातील नागरिक गीताबाईचे नातेवाईक बनले. त्यांनी शासकीय रुग्णालयातूनच रितीरिवाजाप्रमाणे स्वर्गरथातून गीताबाईचा मृतदेह महागाव रोडवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीत नेला व तिथे विधीवत अंत्यसंस्कार केले. यावेळी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. आजच्या धावपळीच्या जीवनात एकीकडे प्रत्येकाला आपआपल्या कामातून वेळ नाही. असे असताना उमरखेड येथील नागरिकांनी एक नवीन वाट समाजाला दाखविली आहे. यामध्ये सुरज दळवी, संजय कुबडे, माधव चौधरी, रमेश खंदारे, प्रताप चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, सुशील शेलार, राजू चव्हाण, रमेश इंगोले, अतुल खंदारे व अष्टविनायक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.