Video - यवतमाळमध्ये दारूच्या दुकानासमोर दूध वाटून प्रचाराचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:05 PM2019-03-29T13:05:57+5:302019-03-29T16:05:54+5:30

उग्र व अभिनव आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने शुक्रवारी (२९ मार्च) यवतमाळमध्ये दारू दुकानांसमोर दूध वाटून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. 

Lok Sabha Election 2019 yavatmal vaishali yede | Video - यवतमाळमध्ये दारूच्या दुकानासमोर दूध वाटून प्रचाराचा शुभारंभ

Video - यवतमाळमध्ये दारूच्या दुकानासमोर दूध वाटून प्रचाराचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देप्रहार संघटनेने शुक्रवारी यवतमाळमध्ये दारू दुकानांसमोर दूध वाटून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात प्रहारने शेतकरी विधवा तथा अंगणवाडी सेविकेला उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले आहे. वैशाली येडे असे या उमेदवाराचे नाव आहे.

यवतमाळ - उग्र व अभिनव आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने शुक्रवारी (२९ मार्च) यवतमाळमध्ये दारू दुकानांसमोर दूध वाटून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. 

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात प्रहारने शेतकरी विधवा तथा अंगणवाडी सेविकेला उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले आहे. वैशाली येडे असे या उमेदवाराचे नाव आहे. यवतमाळात ११ ते १३ जानेवारी दरम्यान झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या उद्घाटक होत्या. प्रहारच्या या उमेदवाराचा अभिनव पद्धतीने होताना प्रचार जनतेचे आकर्षण ठरत आहे. उमेदवार वैशाली येडे एसटीतून फिरुन प्रचार करतात.

शुक्रवारी प्रहारने आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत येथे चक्क देशी दारू दुकानासमोर दुधाचे वाटप करून आंदोलन केले व त्यातून प्रचाराला प्रारंभ केला. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी ही प्रहारची मागणी आहे. या आंदोलनाने यवतमाळकरांचे लक्ष वेधले. उमेदवार स्वत: जनतेला दुधाचे ग्लास भरुन देताना दिसल्या. यावेळी प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे, प्रमोद कुदळे आदी उपस्थित होते. 

Web Title: Lok Sabha Election 2019 yavatmal vaishali yede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.