महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट सांग तू मले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:41 PM2017-08-21T23:41:48+5:302017-08-21T23:42:32+5:30

महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट तू सांग मले,.....

Mahadev Pusa Nandayale | महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट सांग तू मले

महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट सांग तू मले

Next
ठळक मुद्देझडत्यांतून टीका : शेतकरी आत्महत्या रोखण्याची पोळ्यात शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महादेव पुसे नंद्याले,
कर्जमाफीचा बजेट तू सांग मले,
नंदी म्हणे देवा इचारू नका,
आॅनलाईनच्या पाचरीन केला
फार मोठा धोका,
कास्तकार येडे झाले,
काम्पूटर मालुम नाही त्याले,
एक नमन कवडा पार्वती हर बोला हरहर महादेव

यवतमाळच्या पोळ्यात सद्यपरिस्थितीवर वास्तववादी झडत्यांनी चांगलीच रंगत आणली. झडत्यातून झणझणीत अंजन घालत सरकारवर सडकून टीका केली. तर शेतकरी आत्महत्या रोखण्याची पोळ्यात नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी उपस्थिताना शपथ दिली. उत्कृष्ट बौलजोडी स्पर्धेत मोहाच्या उमेश गायकी यांच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
येथील आझाद मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कांचन चौधरी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सभापती नित्यानंद गिरी, नगरसेवक गजानन इंगोले, दिनेश चिंडाले, राजेंद्र डांगे, डॉ. सुरेंद्र पदमावार, डॉ. हटकर, डॉ. वटाणे, पिंटू बांगर, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर डेरे उपस्थित होते.
यवतमाळ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने आयोजित या स्पर्धेत गतवर्षीच्या तुलनेत संख्येने कमी जोड्या दाखल झाल्या होत्या. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा १० हजाराचा पुरस्कार दिनेश तिवाडे यांनी पटकावला. तिसरा क्रमांक पुरस्कार मडकोना येथील जोडीने, चौथा क्रमांक पंजाब मेश्राम यांच्या बैलजोडीने, पाचवा क्रमांक भारीचे मनोहर चव्हाण यांनी पटकावले. तर प्रोत्साहनपर बक्षीस निखील सालोडकर, अनिल मिश्रा, अरूण शिर्के, दिपक सुलभेवार, किरण मिसाळ यांच्या बैलजोडींना देण्यात आले.
यावेळी सरकारवर टीका करणाºया झडत्या सतीश त्रिवेदी यांनी सादर केल्या. यावेळी गजाली यांनी पोळ्याच्या सणावर कविता सादर केल्या. तर काही शेतकºयांनी परंपरागत झडत्या म्हटल्या.
सरकारी बँका मंदी बाबू,
झडत्या म्हणे दाबू दाबू,
आज आवतन घ्या
पण उद्या जेवाले नका येवू,
कास्तकार बैलापेक्षा निपटार झाला,
आॅनलाईनचा सारा बोºया वाजला,
एक नमन गौरा पार्वती हर बोला
हरहर महादेव.

असा गजर मैदानवार सारखा घुमत होता.

Web Title: Mahadev Pusa Nandayale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.