दिवाळीतही महालक्ष्मी उपाशीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:12+5:30
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीबाई पडघने नामक महिला गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करते. तिला आजपर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. लहान मुलांच्या खेळण्यासारखे तिचे घर आहे. घराला भींतही नाही. तिच्या घरात बसूनच जावे लागते. पतीच्या निधनानंतर काही वर्षांपूर्वी तिच्या तरूण मुलाचेही निधन झाले. घरात कमावते कोणीही नाही. त्यामुळे शेतात मोलमजुरी करून ती आपले दिवस काढात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीची कृपादृष्टी राहावी म्हणून यथासांग विधीवत पूजन होते. मात्र समाजातील अनेक लक्ष्मी आजही एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करीत आहेत. येथील लक्ष्मीबाईचीही ससेहोलपट सुरू आहे. शासकीय मदतीपासूनही ती वंचित आहे.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीबाई पडघने नामक महिला गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करते. तिला आजपर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. लहान मुलांच्या खेळण्यासारखे तिचे घर आहे. घराला भींतही नाही. तिच्या घरात बसूनच जावे लागते. पतीच्या निधनानंतर काही वर्षांपूर्वी तिच्या तरूण मुलाचेही निधन झाले. घरात कमावते कोणीही नाही. त्यामुळे शेतात मोलमजुरी करून ती आपले दिवस काढात आहे.
गेल्यावर्षी दिवाळीत काही समाजसेवकांनी तिला साडी व घरी उरलेला चिवडा देऊन आपला मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा भाकरीचा प्रश्न सोडविण्याच्या भानगडीत कोणीही पडले नाही. शासनच्या योजनाही तिच्यापर्यंत पोहोचल्या नाही. अशा लोकांसाठी विविध योजना असते. मात्र त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत का पोहोचत नाही, असा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी कागदपत्रे अपुरी असल्याने योजनेचा लाभ मिळणार नाही, एवढेच उत्तर त्यांच्या कानी पडते.
मागीलवर्षी उमरखेड येथील तत्कालीन तहसीलदारांनी लक्ष्मीबाई पडघणे यांच्या परिस्थितीची दखल घेत तिला तातडीने श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा म्हणून यंत्रणा कामी लावली होती. मात्र त्यांची बदली होताच यंत्रणा सुस्तावली. परिणामी लक्ष्मीबाईच्या कागदांची फाईल कोठे अडली, हे आजपर्यंत तिलाही कळलेच नाही.
बोगस लाभार्थ्यांनाच मिळतो लाभ
अनेक धडधाकट आणि बोगस लाभार्थी खोटी कागदपत्रे तयार करून शासकीय योजना लाटतात. काही महाभाग अशांना सरकारी योजना मिळवून देतात. मात्र खरे गरजवंत एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करतात. लक्ष्मीबार्इंची भेट घेतली असता तेव्हा तिने एकच प्रश्न केला. ‘खरच मला मदत मिळेल का’, या निरागस प्रश्नाने आम्हीही हादरून गेलोे.